शिर्डीसाठी साप्ताहिक विशेष रेल्वे

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – दादर (मुंबई) ते शिर्डी दरम्यान साप्ताहिक सुपर फास्ट आरक्षित विशेष गाडी सुरु होणार आहे. या गाड्यांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

02147 डाऊन साप्ताहिक विशेष गाडी दादर येथून 5 मार्चपासून दर शुक्रवारी 21.45 वाजता गाडी सुटेल आणि शिर्डी येथे दुसर्‍या दिवशी 03.45 वाजता पोहोचेल. नाशिक रोडला ती 00.47 वाजता तर मनमाडला 01.45 पोहोचेल. कोपरगावला येताना व जाताना तीला थांबा आहे. 02148 अप साप्ताहिक गाडी शिर्डी येथून दर शनिवारी सकाळी 07.25 वाजता सुटेल आणि दादर येथे त्याच दिवशी 13.25 वाजता पोहोचेल.

मनमाडला ती 08.45 वाजता तर नाशिक रोडला 09.42 वाजता पोहोचेल. 1 वातानुकूलित व्दितीय श्रेणी, 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 7 शयनयान, 5 व्दितीय श्रेणी आसन अशी तीची रचना आहे. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर आरक्षण करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here