आटपाडी (प्रतिनिधी ) – राजारामबापु हायस्कुल अँड ज्युनियर कॉलेज, आटपाडीच्या विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून उत्तीर्ण विद्यार्थी , प्रशाले सह शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या ज्यूनियर कॉलेज मधील अनामिका अरविंद धायगुडे, साक्षी तानाजी निकम, हर्षवर्धन मारूती खताळ , अनिकेत हणमंत दबडे,संकेत दिलीप पाटील या पाच विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यासह राजारामबापु हायस्कुल अँड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक काकासाहेब जाधव,विभाग प्रमुख हणमंतराव चव्हाण ,सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर, कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.







