केज येथे अनैतिक संबंधातून गुप्तांग आवळून खून!

केज – तालुक्यातील युसूफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लादेवडगाव येथे बाबासाहेब चंद्रभान लाड (वय ४०) या इसमाचा अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून झाला. लाडेवडगाव शिवारात त्याच्या गुप्तांगावर लोखंडी रॉडने मारहाण व धारदार शास्त्राने वार करून गुप्तांग आवळून खून करण्यात आला.
दि.१८ जुलै रोजी सकाळी लादेवडगाव केंद्रेवाडी फाट्या जवळील कर्ताडा नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात फवारणी करायला गेलेल्या शेतकऱ्याला नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. हा मृतदेह बाबासाहेब लाडचा (वय ४०) होता. त्यामुळे त्या शेतकऱ्याने गावात लगेच या घटनेची माहिती दिली. खून झालेल्या लाडच्या मांडीवर आणि गुप्तांगावर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राचे व्रण आहेत. गुप्तांग आवळून त्याचा खून केला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच मृतदेह पडलेल्या ठिकाणी सोयाबीनची नासधूस झाल्याच्या खुणा दिसून येत आहेत.
दरम्यान दि. १७ जुलै रोजी बाबासाहेब लाड, त्याचा भाऊ बबन लाड या दोघांना बाळू सदाशिव केंद्रे आणि त्याचे साथीदार मेव्हणे व इतरांनी एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मारहाण केली होती. या भांडणाच्या व मारामारीच्या भितीने बाबासाहेब हा परळी तालुक्यातील त्याच्या मुलीच्या गावी गेला होता. परंतु जनावरांच्या चारा पाण्यासाठी परत तो लादेवडगाव येथे परत आला आणि पाळतीवर असलेल्या लोकांनी त्याचा खून केला असावा अशी चर्चा सुरु आहे.
दरम्यान, खून झालेल्या बाबासाहेब लाड यांचा भाऊ बबन लाड यांनी पोलिसात फिर्याद किली आहे. त्यावरुन युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here