पंतप्रधान नरेंद्र मोदी सेरावीक ग्लोबल एनर्जी अॅड एनव्हायरमेंट लीडरशिप अवॉर्डने सन्मानित

नवी दिल्ली – ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचे अनेक आघाड्यांवरील अभियान आणि जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पंतप्रधान मोदी यांना शुक्रवारी सेरावीक ग्लोबल एनर्जी अॅड एनव्हयरमेंट लीडरशिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. एका ऑनलाइन कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार दिला गेला. पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमात संबोधित करत हा पुरस्कार भारतीय जनतेला अर्पण केला. पर्यावरण संरक्षण क्षेत्रात भारत प्रमुख भूमिका बजावेल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

हा पुरस्कार नम्रतेने स्वीकारतो आणि तो भारताच्या जनतेला नावे करतो. यासह हा पुरस्कार पर्यावरण संरक्षणाच्या भारताच्या महान परंपरेला अर्पण करतो. अनेक दहशकांपासून भारतीय पर्यावरण संरक्षणात प्रमुख भूमिका बजावत आहेत. भारताची संस्कृती आणि प्रकृती हे खोलवर रुजले आहेत. महात्मा गांधी हे जगातील एक महान पर्यावरण संरक्षक होते. गांधींच्या मार्गावर हे जग चाललं तर मानवासमोर आज ज्या समस्या आहेत तेवढ्या राहणार नाहीत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

संपूर्ण देशात एलपीजी इंधनाचा विस्तार करायचा आहे. हायड्रोजन मोहीम आणि पीएम कुसम सारख्या योजना सरकारने पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने उचललेले पाऊल आहे. पर्यावरण संरक्षणाचा दुसरा मार्ग म्हणजे आपल्या व्यवहारात बदल करणं. कुठलीही वस्तू विचार न करता ती वाया घालवण्याची भारतीयांची परंपरा नाही. पण मोठ्या पातळीवर आपल्या व्यवहारात माफक पर्याय शोधण्याची गरज आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here