भिवंडी येथे ठेकदाराच्या गलथान कारभारामुळे स्कूटीस्वार मुलीसह खोल खड्ड्यात

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – भिवंडी- वाडा रोडवर शेलार नदीनाका इथं आरसीसी रोडचे आणि नाल्याचे काम सुरू आहे. परंतु, ठेकदाराच्या गलथान कारभारामुळे नाल्याचे खड्डे असताना कोणत्याच प्रकारे नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली गेलेली नाही. रस्त्याच्या बाजूला खड्डे पडलेले असतांनाही तिथे बॅरेकेड्स लावले नसल्याने शुक्रवारी दुपारी एक दुचाकीस्वार आपल्या मुलीसह थेट खड्ड्यात पडला.

धक्कादायक म्हणजे, दुचाकीस्वारासोबत दुचाकीवर समोर एक चिमुरडी बसलेली होती. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे दुचारीस्वार रस्त्याच्या बाजूने उतरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. नेमकं त्याच वेळी तोल गेल्यामुळे बाजूला असलेल्या खड्ड्यात दुचाकीस्वार पडला.

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, दुचाकी ही चिमुरडीच्या अंगावर पडली. भिवंडी-वाडा रोडवर मुलीला घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. या घटनेत मुलीला आणि तिच्या पित्याला दुखापत झाली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दोघे खड्ड्यात पडल्यानंतर स्थानिक लोकांनी तातडीने धाव घेऊन चिमुरडीला आधी बाहेर काढले त्यानंतर दुचाकीस्वाराला बाहेर काढले. या घटनेत दोघेही जखमी झाले आहे. खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर स्थानिकांनी मुलीला आणि दुचाकीस्वाराला जवळच्या दवाखान्यात नेले. उपस्थित नागरिकांनी या बेजबाबदार ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here