अमरावती अनलॉक; सर्व दुकाने उघडली पण भीती मात्र कायम

नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – कोरोनाने थैमान घातले असताना 22 फेब्रुवारीपासून अमरावतीत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. आज लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे.

बाजारातील सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपरी 4 वाजेपर्यंत उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे मागील दहा-बारा दिवसांपासून शांत असणाऱ्या अमरावती शहरात काहीशी गर्दी झाली आहे. कामानिमित्त अमरावतीकर घराबाहेर पडत आहेत. मात्र, तरी कोरोनाची भीती कायम आल्याचे जाणवत होते.

काही राजकीय मंडळी आणि व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला विरोध केल्याने जिल्हा प्रशासनाने आजपासून शहर संपूर्ण खुले करण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी अमरावती शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाची धास्ती कायम आहे. शहरातील शासकीय कोविड रुग्णालयासह सर्व खासगी रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी आहे. गृह विलगीकरणातही अनेक रुग्ण आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here