ऑनलाईन सत्रादरम्यान सुरु राहिला वकिलाचा कॅमेरा, सॉलिसीटर म्हणाले ‘आम्हांलाही पाठवा’

पटना (बिहार)- सोशल मिडीयावर ऑनलाईन असतांना अनेकदा कॅमेरा सुरु राहिल्याने, अनेक गंमतीशीर गोष्टी घडत असतात. असाच एक सॉलिसीटर तुषार मेहता यांनी टाकलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच फिरताना दिसत आहे. मेहता यांच्या मजेशीर प्रतिक्रियेवर चांगलीच चर्चा रंगली आहे.

गेल्या वर्षभरामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊननं ऑनलाईन मिटींग आणि झूम कॉलचा वापर वाढला आहे. या काळात कोणाचे कॅमेरे तर कोणाचे माईक सुरू राहिल्यानं झालेली फजिती आपण अनेकदा पाहिली आहे. यातील अनेकजण तर अगदी ट्विटरवर ट्रेंडही झाले आहेत. आता असाच आणखी एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक वकील कोर्टाच्या ऑनलाईन सत्रादरम्यान हातामध्ये ताट घेऊन भोजनाचा आनंद घेत आहे. मात्र, आपला कॅमेरा सुरूच असल्याची कल्पना या वकीलाला नव्हती. त्यामुळे हा मजेशीर व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये पटना उच्च न्यायालयाचे एक वकील आपल्या हातामध्ये जेवणाची थाळी घेऊन कॉमप्यूटरसमोर बसले आहेत. तर, यातच स्क्रीनवर भारताचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहताही दिसत आहेत. या व्हिडीओमधील वकीलांचं नाव श्रत्रशाल राज असं असून अजूनही मेहता कॉलवर आहेत, याची त्यांना कल्पना नाही आणि ते हातात थाळी घेऊन जेवण करत आहेत.

आपल्या कॉलचा आवाजही राज यांनी म्यूट केला आहे. त्यामुळे, आवाज जात नसल्यानं तुषार मेहता यांनी थेट राज यांना कॉल केला.. त्यानंतर ही बाब लक्षाच येताच राज यांनी आपल्या हातातील प्लेट ताबडतोब खाली ठेवत कॅमेरा बंद करण्याचा प्रयत्न केला. तर, यानंतर मेहता राज यांची फिरकी घेत ‘यहाँ भेजो’ म्हणजेच आम्हाला भोजन पाठवा, असं म्हणताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला असून, आतापर्यंत या व्हिडीओला ६४ हजार लोकांनी बघितले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here