अनुदानाचे घोडे कुठे अडले महागाईने तर गरिबांचे कंबरडेच मोडले
बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शाह) – घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्यामुळे गरीब कुटुंबातील नागरिकांना चुलीवरच्या नैसर्गिक जेवनाचा आनंद घ्यायला मिळत असल्याने खऱ्या अर्थाने मोदी सरकारचे अच्छे दिन अशी खात्री सुगरणींना पटू लागले आहे आपल्या भारताचे सर्वांचे लाडके पंतप्रधान सबका साथ सबका विकास उज्वला गॅस योजना अंतर्गत मोठ्या गाजा वाजत मिळालेल्या मोफत गॅस सध्या गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे
तिकडे आपल्या वर बंदी आणून व एकीकडे रॉकेल रॉकेल बंद करून वृक्षतोडीवर आळा घालून नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करणे झाडांची संख्या वाढवणे तसेच झाडे लावा झाडे जगवा या घोषणा राष्ट्रीय पातळीवर भाव खात असल्या तरी प्रत्यक्षात सर्वसामान्य कुटुंबांना आपला घर खर्च भागवताना नाकीनऊ येत आहे प्रमाणाच्या बाहेर वाढलेल्या गॅसच्या किमती वाढल्याने लागणाऱ्या सरपणासाठी वृक्षतोडीचे संकट पुन्हा आवासून उभे राहिले आहे मोफत गॅस वाटप करून फोटोसेशन पुरती महिलांची धुरापासून सुटका झाली खरी आर्थिक बचत मधून सर्वसामान्यांची कशी सुटका होणार हा खरा विचार करायला लावणारा प्रश्न आहे
आत्ताच्या घडीला गॅस भरण्यासाठी 930 रुपये मोजावे लागत आहे केंद्र शासनाकडून सबसिडीच्या नावाखाली पैसे वसूल करण्यात येत आहे पण ग्राहकांच्या खात्यावर मार्च दोन हजार वीस पासून अनुदानाची एक रुपया ही रक्कम जमा होत नसल्याने समोर आले आहे सरकारच्या ढिसाळ नियोजन व ग्रामीण भागातील मोठी नाराजी व्यक्त होताना दिसत आहे हे मात्र खरे काँग्रेस सरकारच्या काळात 340 रुपयांना मिळणारा गॅस आता भाजपाच्या सरकारात 779 रुपयाला मिळू लागला आहे मोदी सरकारने पुन्हा गॅसवर नव्हे तर चुलीवरच स्वयंपाक करण्यास भाग पाडले आहे त्यामुळे मोदी सरकारचा निषेध नोंदविला आहे






