कोरोना लसीकरण केंद्रावरच आजीबाईंनी साजरा केला शंभरावा वाढदिवस

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – गेल्या वर्षभर जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाविषयी लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे. मात्र सध्या कोरोनाचं लसीकरण चालू झाल्यानं लोकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र लसीकरणाच्या कमतरतेमुळे आधी वृद्ध लोकांना प्राधान्य दिलं जातं आहे.

याच पार्श्वभूमीवर देशात अनेक वृद्ध लोकांना कोरोना लसीकरण करण्यात आलं आहे. मुंबईतील एका आजीबाईंनीसुद्धा ही लस टोचून घेतली आहे. मात्र याचं वैशिष्ट्य हे आहे की लसीकरण्याच्या दिवशीच आजीबाईंनी आपल्या वयाची शंभरी पूर्ण केली. त्यांचा 100 वा वाढदिवस होता.

मुंबईतील वांद्रा -कुर्ला परिसरात राहणाऱ्या या आजीबाईंनी आधी कोरोनाचं लसकरण केलं आणि त्यानंतर लसीकरण केंद्रावरच कर्मचाऱ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या 100 वर्षांच्या आजीबाईंनचं नाव ‘प्रभावती खेडकर’ असं आहे. मुंबईच्या अंधेरी भागात त्या राहतात. त्या लसीकरणासाठी आल्या असता. त्यांच्या लसीकरण कार्डवर 5 मार्च 1921 अशी जन्मतारीख होती. ते पाहताच केंद्रावरील आरोग्य अधिकाऱ्यांनी लगेच केक मागवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि 100 वर्षांच्या या आजीबाईंच्या वाढदिवसाचा हा व्हिडीओ अल्पावधीतच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here