घराच्या बागेतच सापांमध्ये जुंपलं तुंबळ युद्ध; व्हायरल झाला व्हिडीओ

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – सोशल मीडियावर कायम विविध पशू-पक्ष्यांचे गजब व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज पाहून अनेकदा आपण तोंडातच बोट घालतो. अनेकदा हे व्हिडिओज पाहून अंगावर शहारे येतात.असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत दोन सापांमध्ये फाईट सुरू आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच वेगानं व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर Snakes of India या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला गेला आहे. या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘दोन सापांमधली जुगलबंदी आपल्या बागेत पाहणं हा अतिशय आश्चर्यकारक आणि रोमांचक अनुभव आहे.

मला आनंद वाटतो, की माझ्या कुटुंबानं हे पाहण्याचा आनंद घेतला.’ हा व्हिडिओ जसा शेअर केला गेला तसं सोशल मीडियावर लोक तो एकमेकांशी शेअर करू लागले. या व्हिडिओला आजवर 30 हजारहून जास्त वेळा पाहिलं गेलं आहे.

दोन सापांमधलं हे अटीतटीचं युद्ध पाहून हरेकजण हैराण आहे. कारण असं कमीच वेळा होतं, की दोन विषारी सापांमधली लढाई पाहण्याची संधी मिळावी. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, की दोन साप एकमेकांमध्ये पूर्ण लपेटलेले आहेत. फणा काढून ते एकमेकांना एकटक पाहत आहेत. मध्येच एकमेकांवर हल्ला चढवत आहेत. या दोघांना असं पाहून कुणालाही भीती वाटेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here