अक्कलकोट-तडमुड: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काम अखेर मार्गी लागला,अनेक शेतकऱ्यानां पावसाळ्यात ओढा ओलांडून शेताकडे जातांना आपला जीव धोक्यात घालून ओढा पार करत होते,खूप वर्षापासून असच चालत होत.
पायवाट,बैलगाडीरस्ता,आणि मैंदर्गी नगरपरिषद जॅकवेल ला पावसाळ्यात येण्यासाठी जाण्यासाठी पुर्णपणे रस्ता बंद होत असे,आणि पाणीपुरवठा खंडीत होत असे.म्हणून ओढ्यावरती पुल/ब्रिज बांधणीचे काम अखेर मंजुर झाले,आणि पुलाच्या कामाचे उदघाटन शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवर किरण केसुर ,नगरसेवक हणमंत आलूरे ,नागराज अडाकूल,संजू सवळी,सुरेश दिवटे, गंगाधर दिवटे,आसिफ तडमुड,बाबू तडमुड, ज्योतिबा चौहान,मादप्पा दिवटे,शिवा दिवटे, गजानन दिवटे,राजू जेवर्गी आदी मान्यवर उपस्थित होते,सदर पुलाच्या कामाला सुरूवात करण्यात आले.






