जागतिक महिला दिनी उत्कृष्ट कार्याबद्दल महावितरणकडून पार्वताबाई चंडोल यांना प्रमाण पत्र प्रदान

बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शाह) – खुलताबाद तालुक्यातील महावितरण शाखा कार्यालय बाजार सावंगी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

या कार्यक्रमात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या वायरमन श्रीमती पार्वताबाई चंडोल यांनी कुठल्याच प्रकारची जीवाची तमा न बाळगता महावितरणच्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देत थकबाकी ग्राहकाकडून वसुली करून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महावितरण औरंगाबाद ग्रामीण मंडळ कार्यालयातर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने श्रीमती चंडोल यांना प्रमाणपत्र देऊन सम्मानित करण्यात आले. अशाप्रकारे ग्राहकांना उत्कृष्ट सेवा प्रदान करावे ही अपेक्षा व महावितरण कार्यालयतर्फे त्यांच्या कुटुंबीयांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

mahavitaran-bajarsavangi

 

paravatabai-chandol-certificate

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here