मुंबई (संपादक सुनिल पाटील) – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सौ. समिक्षा दळवी आणि श्रीमती सुनिता दिवे यांनी वरळी पोलीस स्टेशन येथे एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमांची सुरुवात केक कापून करण्यात आली. सगळ्या महिलांनी एकमेकांचे तोंड गोड करत आनंद साजरा केला..
त्यासोबतच सौ समीक्षा दळवी आणि सुनिता दिवे यांच्यातर्फे पोलीस महिलांना, त्यांनी कोविड वेळेस केलेल्या कामगिरीबद्दल धन्यवाद देण्यात आले. या सगळ्यांचे कौतुक करण्यासाठी म्हणून पेडिक्युअरच्या फ्री कुपन्स देण्यात आले. या कार्यक्रमाला प्रतिसाद देत महिला पोलीसांनीही या दोघींनी केलेल्या या नियोजनासाठी मनापासून आभार मानले.
या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक अशोक मोरे, पोलीस उपनिरीक्षक कारके, पोलीस अंमलदार मनोज काळेबाग आणि पोलीस अंमलदार सूर्यकांत पवार यांनी मोलाचं सहकार्य केले.






