जागतिक महिला दिन विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले
अक्कलकोट-तडमुड: यावेळी सर्व स्तरावरील सामाजिक योगदान देणारे व यशस्वी महिलांचे सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वेदमूर्ती परमपूज्य सोमशेखरय्या सालीमठ (मैंदर्गी) यांच्या दिव्यासानिध्यात, सुरेखा होळीकट्टी यांच्या अध्यक्षत्याखाली हा कार्यक्रम पार पडला.
जागतिक महिला दिना निमित्त दिनांक ०७ मार्च रोजी शहरातील महिलांसाठी संगीत खुर्ची, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी फजलेरहमान शाब्दी, भागीरथी बरमा, कमलाबाई हुळ्ळी, बसम्मा गोब्बूर, सुरेखा गोब्बूर, रेवबाई धनगर, सुभद्रा बंडे, योगीराज बाजारमठ, शिवशंकर आलमेल, नागण्णा दुर्गी, जैनुद्दीन सर, ओंकार बुरुड, अय्यूबसाहेब लुकडे, राजशेखर मसुती, दिलीप शावरी, मंजुरसाब लुकडे, ज्योतिबा चव्हाण, धानप्पा हसरमनी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश दादा शावरी युथ फौंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धाराम निंबाळ यांनी केले. आभार बाबू बाजारमठ यांनी मानले.







