अलिबाग तालुक्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत 71 नवीन रुग्णांची लक्षणीय वाढ

  • 3 रुग्णांचा मृत्यू
  • बाधित रुग्णांची संख्या 644
  • आज 12 रुग्णांची कोरोनावर मात

अलिबाग शहर, शहाबाज, मांडवखार, वायशेत, वालवडे, सहाणगोठी, नवेदर-नवगाव, सागांव, बहिरोळे, गोंधळपाडा, थेरोंडा, विद्यानगर, चेंढरे, सारळ, थळ बाजार, वरसोली, आवास येथील रुग्णांचा समावेश

अलिबाग-सोगावकर – आज (19 जुलै)रोजी कोरोनाच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे,वाढत्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, या कोरोनाच्या अधिक प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन घेण्यात आला असला तरी कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यात अद्यापही यश आलेले नाही. अलिबाग तालुक्यात आज आतापर्यंतच्या सर्वाधिक उच्च्यांकी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आज (19 जुलै)दोन मृत व्यक्तींसह तब्बल 71 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने, बाधित रुग्णांची संख्या सहाशेच्या पार गेली आहे. तर मृतांचा आकडा 17 वर गेला आहे.
अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज नवीन नोंद झालेल्या रुग्णांमध्ये गोविंद बंदर-अलिबाग येथील 1, हनुमान मंदिरजवळ-शहाबाज येथे 1, मांडवखार येथे 2, शारदा को.ऑप.सोसायटी-ब्राह्मणआळी अलिबाग येथील 1, शहाबाज येथील 5, अलिबाग पोलीस स्टेशन येथील 1, वायशेत येथे 1, रोहिदास नगर समर्थ सोसायटी येथे 1, वालवडे येथे 4, कमळपाडा-शहाबाज येथे 1, रामनाथ येथे 2, सागांव येथे 2, बहिरोळे येथे 1, केदार निवास-गोंधळपाडा येथे 2, कुंभारआळी-रामनाथ येथे 1, श्रीबाग नं. 2 येथे 1, थेरोंडा येथे 2, सुमंगल सोसायटी-नागडोंगरी येथे 1, वरुण सोसायटी-विद्यानगर येथे 2, दत्तपाडा-सारळ येथे 3, बोडणी येथे 17, कोप्रोली-सारळ येथील 1, श्रीगणेश सोसायटी-शिवनगर चेंढरे येथील 1, रेवस कोळीवाडा येथील 7, अलिबाग बाजारपेठ 3, मातोश्री-गोंधळपाडा येथील 1, थळ बाजार येथील 1, बुरुमखाण-वरसोली येथील 1, रेवस येथील 1, तेजोमय बंगला-आवास येथील 1 यांचा समावेश आहे.
सहाणगोठी येथील 77 वर्षीय व्यक्ती आणि मच्छिमार सोसायटी नवेदर नवगाव येथील 58 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या दोन्ही मृत व्यक्तींची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आली आहे. याव्यतिरिक्त बोडणी येथील 51 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या तीन मृतांमुळे तालुक्यात कोरोना बळींची संख्या 17 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आज 12 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. शिवाजीनगर चेंढरे येथील 1, आंबेपूर येथील 1, वरसोली कोळीवाडा येथील 3, वैद्यबाग कामतआळी येथील 1, अलिबाग कोळीवाडा येथील 2, स्वामी समर्थ नगर चेंढरे येथील 1, शास्त्रीनगर कोळीवाडा येथील 1, विद्यानगर येथील 1, शहापूर येथील 1 अशा 12 जणांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
दरम्यान, आज नोंद झालेल्या 71 नव्या रुग्णांमुळे आजअखेर बाधित रुग्णांची संख्या 644 वर पोहोचली आहे. यापैकी 17 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 238 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 389 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार शेजाळ यांनी दिली. तरी नागरिकांनी अधिक प्रमाणात काळजी घेण्याची आवश्यकता आहे असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here