मुंबई (प्रमिला जाधव) – शिवसेना शिवडी विधानसभेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या वतीने अभ्युदय नगर हॉल, काळाचौकी येथे नुकतेच सामाजिक अंतर ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये विभागातील शिवसैनिकांनी, नागरिकांनी आणि विविध मंडळाच्या सभासदांनी रक्तदान करून सहभाग घेतला. या शिबिरांमधून तब्बल 400 पेक्षा जास्त बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. या शिबिरात विभागातील महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन रक्तदान केले. या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रमाणपत्र आणि आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. आम्ही सामाजिक बांधिलकी जपून या कोरोना वैश्विक महामारीमुळे रक्ताची कमतरता असल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तसेच लोकांना रक्तदानाचे महत्त्व समजावे आणि त्यातून जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही हे रक्तदान शिबीर आयोजित केले असल्याची माहिती नगरसेवक अनिल कोकीळ यांनी दिली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी नगरसेवक सचिन पडवळ, नगरसेवक दत्ता पोंगडे, शाखाप्रमुख जयसिंग भोसले, शाखाप्रमुख किरण तावडे,महिला पदाधिकारी कांचन घाणेकर, विविध पदाधिकारी आणि युवा सैनिकांनी विशेष मेहनत घेतली. शिबिराला विभागातील अनेक मान्यवर मंडळींनी आणि सामाजिक संस्थांनी भेट देऊन कौतुक केले.







