स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता
चोपडा (संदीप ओली) –आज प्राप्त झालेल्या 24 अहवालापैकी 13 व्यक्तींचे रिपोर्ट पॉजाटिव्ह आले आहे.त्यामधे वर्डी गावातील 5,लासुर ,अकुलखेडा गुजरअळी,श्रीराम नगर,आदर्श नगर व केजिएन कॉलनी येथील प्रत्येकी 1 असे एकूण 11 व अमळनेर येथील उपचार घेत असलेले 2 असे एकूण 13 अहवाल पॉजिटिव्ह असल्याचे तालुका वैद्यकिय अधिकारी लासुरकर यांनी सांगितले.
आता चोपडा तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 542 झाली आहे.त्यापैकी 359 बरे झाले आहेत 27 मृत झालेले आहेत.
दिवसेंदिवस तालुक्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र दिसत आहे.तरी गावातील बाजारामधिल लोकांची गर्दी कमी व्हायचे नाव घेत नाही.दररोज खेड्यापाड्यातुन हजारो लोक शहरामधे येतात.कुठल्याही प्रकारच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही.तरी येथील स्थानिक प्रशासनाने दखल घेऊन कठोर पावले उचलावीत व होणार्या कोरोनाच्या या प्रसाराला आळा घालावा अशी सर्वसामान्यांतुन मागणी होत आहे.







