जिल्ह्यात कोरोना थैमान सुरुच, आज आढळले ३०४ कोरोना बाधित

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोनाचे थैमान पार असून, कोरोना बाधितांचा आजही पुन्हा तीनशेचा आकडा पार झाला आहे. आज ३०४ कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या आता ७७९६ झाली आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधिताच सर्वाधिक १०७ कोरोना बाधित जळगाव शहरात आढळून आले आहेत. दरम्यान दिवसभरात दहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर १७४ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
आज आढळलेल्या ३०४ रुग्णांमध्ये जळगाव शहरात १०७, जळगाव ग्रामीण १५, भुसावळ १९, अमळनेर १०, चोपडौ १६, पाचोरा २१, भडगाव ५, धरणगाव १८, यावल ६, एरंडोल ४, जामनेर २१, रावेर २९, पारोळा ५, चाळीसगाव १५, मुक्ताईनगर ९, बोदवड ४ असा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्या १० रुग्णांमध्ये जळगाव शहर, चाळीसगाव, रावेर तालुक्यातील प्रत्येकी २ तर पाचोरा, अमळनेर, भडगाव तालुक्यातील एक कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here