आंतरराष्ट्रीय मानवधिकार असोसिएट्स मुंबई शहर आयोजित “जागर स्त्री शक्तीचा”

शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) – 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सूर्योदय क्रीडा मंडळ हॉल, रामेश्वर विद्यामंदिरजवळ, दत्तमंदिर रोड, वाकोला, सांताक्रूझ (पु) मुंबई येथे सकाळी 11 वाजता सदर कार्यक्रम घेण्यात आला

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वाकोला सांताक्रूझ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी/ पोलीस निरीक्षक सुनयना नटे, राष्ट्रीय पोषण अभियान, महिला व बाल विकास विभाग व मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या निरीक्षक अनघा नार्वेकर, स्मिता मुकादम निरीक्षक ,अंगणवाडी खार,सांताक्रूझ विभाग, संगीता कुंभार, अंगणवाडी सेविका गट क्रं 6 , ॲड. स्मिता देवकर बोरिवली कोर्ट ह्या प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष ॲड.डॉ.विक्रांत वाघचौरे हे होते. यावेळी वाकोला पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी/ पोलीस निरीक्षक सुनयना नटे व अनघा नार्वेकर यांचे विशेष कार्याचे कौतुक म्हणून प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे मुंबई शहर लीगल एड प्रमुख ॲड.अभय सोडये यांनी केले.

यावेळी सुमारे 100 महिलांना व तरुणींना त्यांचे अधिकार , करिअर विषयक मार्गदर्शन व सोशल मीडियाचा वापर,कौटुंबिक हिंसाचार, महिलांचे अधिकार, आरोग्य विषयक काळजी तसेच महिला उद्योजिका आदी अनेक विषयावर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले व येथून पुढे कोणत्याही प्रकारची अडी अडचणीस मदत करण्याची ग्वाही मा पोलिस निरीक्षक वाकोला पोलिस स्टेशन यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स चे महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी श्री विवेक जी साळवी व ॲड.अभय सोडये यांचे मार्फत सर्व उपस्थित महिला भेट वस्तू दिली व अल्पोहार देण्यात आला. कार्यक्रमाचे आभार आणि निरोप आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स चे जनसंपर्क अधिकारी-महाराष्ट्र राज्य, श्री विवेक जी साळवी यांनी केला. यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स चे अनेक पदाधिकारी , सदस्य, प्रभागातील महिला व अंगणवाडी सेविका मोठया संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here