पक्ष बदलला म्हणून माझ्यावर विनाकारण कारवाई – एकनाथराव खडसे

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मी पक्ष बदलला, भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो, पक्षांतर केल्यामुळेच माझ्यावर ईडीमार्फत अकारण कारवाई करण्यात येत असल्याचा दावा माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला.

मंत्रिपदाचा गैरवापर करत कमी किंमतीत पुणे, भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदी केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने ऑक्टोबर महिन्यात नाथाभाऊंविरोधात ईसीआयआर दाखल केल्याने त्यांनी याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

एकनाथराव खडसेंच्या वतीने ॲड. आबाद पोंडा यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले की, आपला केवळ समन्सलाच नाही तर ईडीच्या ईसीआयआर प्रक्रियेलाही किरोध आहे. ईडी समन्सच्या नावाखाली केव्हाही आपल्याला अटक करेल. आपल्या डोक्यावर ईडीची टांगती तलवार कायम आहे. ॲड. पोंडा यांनी एकनाथराव खडसे सहकार्य करत नसल्याचा ईडीचा दावाही फेटाळून लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here