सॅटेलाईट मॅन ऑफ इंडिया प्रा. उड्डपी रामचंद्र राव यांना गुगलची आदरांजली

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – आज सकाळी सकाळी ज्यांनी गुगलवर काही सर्च करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांना गुगलचे नवीन डुडल दिसले असेल. बऱ्याच जणांना प्रश्नही पडला की, कोणाचे डुडल आहे. तर हे डुडल समर्पित आहे, भारतीय वैज्ञानिक प्राध्यापक उड्डपी रामचंद्र राव यांना. आज त्यांची ८९ वी जयंती आहे.

भारताच्या उपग्रह निर्मिती व प्रक्षेपण कार्यक्रमाला नवी दिशा देणारे म्हणून डॉ.यु.आर.राव यांना सॅटेलाईट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. त्यांच्याच नेतृत्वाखाली १९७५ मध्ये भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला होता. भारताच्या अंतराळ कार्यक्रमात त्यांचे मोठे योगदान होते.

यू. आर. राव यांनी एम.जे. के. मेनन, सतीश धवन, आणि विक्रम साराभाईंसारख्या महान शास्त्रज्ञांसोबत काम केलं होतं. भौतिक संशोधन प्रयोगशाळेच्या गव्हर्निंग कॉन्सिलचे चेअरमन म्हणून ते कार्यरत होते. तिरूवनंतपूरममध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे ते कुलगुरू होते. परदेशातील विद्यापीठांमधील कामांची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. dr-u-r-rao

यू. आर. राव यांनी एम.जे. के. मेनन, सतीश धवन, आणि विक्रम साराभाईंसारख्या महान शास्त्रज्ञांसोबत काम केलं होतं. भौतिक संशोधन प्रयोगशाळेच्या गव्हर्निंग कॉन्सिलचे चेअरमन म्हणून ते कार्यरत होते. तिरूवनंतपूरममध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे ते कुलगुरू होते. परदेशातील विद्यापीठांमधील कामांची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मविभूषण देऊन भारत सरकारने गौरविले होते. आंतरराष्ट्रीय अस्ट्रोनॉमिकल फेडरेशनने राव यांचा समावेश प्रतिष्ठेच्या आईएएफ हॉल ऑफ फेममध्ये केला.

अंतराळ विज्ञान क्षेत्रातील योगदानाकरता भारत सरकारने प्राध्यापक राव यांना 1976 मध्ये पद्मभूषण तसंच 2017मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. 24 जुलै 2017 रोजी 8k5व्या वर्षी प्राध्यापक राव यांचं निधन झालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here