‘मास्टर’ अश्विनसोबत टीम इंडियाच्या खेळाडूंचा भन्नाट डान्स

अहमदाबाद – भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट मॅच अहमदाबादमध्ये होणार आहे. ही या मालिकेतील एकमेव डे-नाईट टेस्ट आहे. या टेस्टसाठी सध्या भारतीय खेळाडू जिममध्ये जोरदार घाम गाळत आहेत. भारताचा प्रमुख स्पिनर आर. अश्विन यानं एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत अश्विन हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने सोबत डान्स केला आहे. अश्विननं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.


भारतीय खेळाडूंचा हा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दक्षिण भारतामधील सुपरस्टार विजयच्या गाण्यावर नाच केला आहे. अश्विन, हार्दिक आणि कुलदीप यांनी ज्या गाण्यावर डान्स केला आहे ते गाणं विजयच्या ‘मास्टर’ या तामिळ सिनेमातील आहे. ‘वाथी कमिंग’ हे ते सुपरहिट गाणं आहे. या गाण्याला YouTube वर 55 मिलियनपेक्षा जास्त हिट्स मिळाले आहेत. या गाण्यातील विजयच्या स्टेप्स चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत.

तामिळ भाषेतील या सिनेमातील गाण्यावर विजयचा फॅन असलेल्या अश्विननं पहिल्यांदा नाचायला सुरुवात केली. त्यानंतर हार्दिकनं नाच सुरू केला. या दोघांच्यामध्ये कुलदीपनं अजब स्टेप्स करत सर्वांचं मनोरंजन केलं.भारतानं चेन्नईमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये पुनरागमन करत 317 रननं विजय मिळवला. अश्विन दुसऱ्या टेस्टचा हिरो होता. त्यानं दुसऱ्या डावात 107 रन केले. त्याचबरोबर पहिल्या डावात पाच तर दुसऱ्या डावात तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवनं या टेस्टमध्ये दोन वर्षांनी पुनरागमन करत दोन विकेट्स घेतल्या. तर, हार्दिक पांड्याला या मालिकेत अजून संधी मिळालेली नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here