दुसऱ्या लग्नासाठी 60 वर्षीय गृहस्थाचे विजेच्या खांबावर चढून शोले स्टाइल आंदोलन

धौलपूर (राजस्थान) – जिह्यात एक 60 वर्षीय चिरतरुण वृद्ध विद्युत खांबावर चढले. कारण त्यांची मुले त्यांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध करत होती. पाच मुले आणि अनेक नातवंडे असलेल्या सोब्रन सिंग यांना आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न करायचे होते. मुलांनी आपले दुसरे लग्न करून द्यावे या मागणीसाठी ते ‘शोले’ चित्रपटातील वीरूप्रमाणे विजेच्या खांबावर चढले.

रविवारी धौलपूरपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या माधा भाऊ गावात ही घटना घडली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सिंग जेव्हा खांबावर चढले तेव्हा त्यांची मुले व नातवंडे काळजीत पडली आणि त्यांनी शेजाऱ्यांना मदतीला बोलावले. विजेच्या खांबाजवळ मोठी गर्दी जमली आणि सिंग यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी नकार दिला.

सिंग यांनी उच्च विद्युतदाब असलेली वायरही हातात धरली आणि आपल्या मुलांनी लग्न करण्यास परवानगी न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. सुदैवाने या वायरमध्ये वीज चालू नव्हती. सिंग यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक उपकेंद्रांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर विद्युत विभागाने परिसरातील वीज तोडली. तब्बल एक तासानंतर स्थानिक तरुणांनी खांबावर चढून या वयोवृद्ध व्यक्तीला खाली उतरवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here