संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझे यांची बदली

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – मनसुख हिरेन प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात मुंबई अडकलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझे यांची बदली गुन्हे शाखेतून (क्राईम ब्रांच) नागरी सुविधा केंद्रात करण्यात आली आहे. काल रात्री पोलीस मुख्यालयातून तसे आदेश काढण्यात आले. सचिन वाझे आतापर्यंत गुन्हे शाखेत कार्यरत होते.

मनसुख हिरेन प्रकरणात त्यांच्यावर संशयाची सुई ठेवण्यात आली आहे. मुकेश अंबानिंच्या घराबाहेर जी स्कॉर्पिओ आढळून आली त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशायास्पद मृत्यू झाला आहे. म्हणून त्या संशयाची सुई सचिन वझे यांच्यावर आहे. असा संशय असताना सचिन वाझे यांची एका रात्रीत झालेली बदली यामुळे हे संशयाचे ढग अधिकच गडद होत आहेत.

विरोधी पक्षांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा संशय थेट सचिन वाझे यांच्यावरच घेतला आहे. म्हणूनच त्यांच्या या अशा अचानक झालेल्या बदलीमुळे हा संशय अधिकच गडद झाला आहे, या बदलीमुले राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना ऊत आला आहे आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here