१९९३ च्या बॉम्बस्फोटाच्या काळ्या आठवणी; १९९३ च्या बॉम्बस्फोटाला १८ वर्षे पूर्ण…

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – मुंबईवर १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेला आज १२ मार्च २०२१ रोजी १८ वर्षे पूर्ण झाली. संपूर्ण मुंबईला हादरवून सोडणाऱ्या आणि मानवजातीला काळिमा फासणाऱ्या या काळ्या घटनेला आज १२ मार्च २१२१ रोजी १८ वर्षे पूर्ण झाली.

२५७ माणसे यात मृत्युमुखी पडली. एकाच वेळेस १३ ठिकाणी मोटारकार वापरून झालेला हे साखळी बॉम्बस्फोट मानवजातीच्या काळ्या इतिहासात लिहिले गेले. दाऊद इब्राहिम वर याच्या संशयाची सुई रोवली गेली आणि दाऊदने त्याचा हा गुन्हा मान्यही केला परंतु दाऊदला पाकिस्तानातून भारतात आणण्यासाठी ज्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या गेल्या त्यात भारताने समाधानकारक कामगिरी केली तरीही पाकिस्तान सरकारने वेळोवेळी दाऊदला पाठीशी घातले आणि तो पाकिस्तानात नाही, असे सांगून त्याला वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. यात अनेक पोलीस अधिकारी तसेच अनेक सामान्य नागरिकांचा जीव गेला. मुंबई अनेक दिवस भीतीच्या छायेत वावरत होती.

१९९२ ला बाबरी मशीद पडल्यानंतर जी दंगल संपूर्ण भारतात उसळली होती ती शांत झाल्यावर पुन्हा ही दंगल १९९३ साली उसळली होती. जोगेशेवरी येथील राधाबाई चाळीतील एका विशिष्ट धर्माच्या लोकांना रात्री जिवंत जाळण्यात आले होते. यामुळे ही दंगल पुन्हा पेटली आणि दोन धर्मियांत तेढ निर्माण झाली. या दंगलीला आज १२ मार्च रोजी १८ वर्षे पूर्ण झाली…. त्या कटू आठवणी जगवण्यासाठी हा लेखनप्रपंच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here