नवी दिल्ली – गेले साडे तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी वर्गाकडून आंदोलन सुरू आहे. यादरम्यान पंजाबमधील अमृतसर येथील कृषी कायद्यांविरोधात रेल्वे रुळांवर बसलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवले आहे.
त्यांनी रेल्वे रुळ मोकळे केल्याने आता या मार्गावरून रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. ट्रेन रद्द झाल्याने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठं नुकसान होत होते. शेतकऱ्यांनी 169 दिवसांनी रेल्वे रुळांवर सुरू असलेले आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमृतसरच्या जंडियाला गुरु रेल्वे स्टेशनवर सुरू असलेले आंदोलन थांबवल्यानंतर अमृतसरहून दिल्ली मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू झाली. यामुळे प्रवासी, व्यापारी, सर्वांना दिलासा मिळाला आहे.






