करू अन्नदान..भुकेल्याला देऊ समाधान

ठाणे (प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – समतोल फौंडेशन ठाणे, निराधार ,निराश्रित ,घरातून वेगवेगळ्या कारणांमुळे दुर झालेल्या ,हरविलेल्या फसवणूक करून आणलेल्या रेल्वे स्टेशनवरील अडचणीत असलेल्या मुलांचे पुनर्वसन करणारी संस्था गेले 16 वर्ष सातत्याने कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सामाजसेवेत कार्यरत आहे.

गेले दोन वर्षे सिव्हिल हाँस्पीटल मध्ये अन्नछत्र चालवत आहे. यापुढे एका दिवसात अन्नछत्र च्या माध्यमाने ५०० पेक्षा जास्त बेघर, अनाथ लोकांना अन्नाचा कण सुखाने समाधानाने ग्रहण करण्यासाठी संकल्प करणार आहे . जे अन्नछत्र कोरोनाच्या पादुर्भावामुळे थांबवले होते ते आज महाशिवरात्री च्या निमित्ताने चालू करण्यात आले. दिनांक ११ मार्च २०२१ रोजी अन्नछत्र चा श्रीगणेशा ठाणे येथे असलेल्या अपूर्वा महिला सामाजिक संस्थेच्या निराधार अनाथ बेघर गरजुंना अन्नदान करून करण्यात आला.thane-news

या प्रसंगी समतोल संस्थेचे संस्थापक विजय जाधव, समतोल फौंडेशनचे समतोल मित्रत्व जपणारे श्री राजेंद्र गोसावी, श्री. अनंत आगरकर, ऍड. महेश भालेकर, जेष्ठ पत्रकार सुभाष जैन हे सर्व मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या मदतीने आज महाशिवरात्री खऱ्या अर्थाने साजरी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here