अभिनेता मनोज बाजपेयीला कोरोनाची लागण

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी एकीकडे लस उपलब्ध झाली असताना, दुसरीकडे या विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी याला देखील कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज बाजपेयी एका चित्रपटाचे शूटिंग करत होता, त्याच दरम्यान त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता यामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मनोज बाजपेयी हा चित्रपट निर्माता रॉनी स्क्रूवाला यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होता. मनोजला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले. आता या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यास काही महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक कनू बहल देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here