‘बॉम्बे बेगम्स’ वादाच्या भोवऱ्यात; 24 तासांत स्ट्रिमिंग थांबवण्याची बजावली नोटीस

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – ‘मिर्झापूर’, ‘तांडव’नंतर आता नेटफ्लिक्सची ‘बॉम्बे बेगम’ ही वेब सीरिज वादाच्या भोवऱयात अडकली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने सीरिजमधील काही दृश्यांवर आक्षेप दर्शवला असून 24 तासांत सीरिजचे प्रदर्शन रोखण्याचे आणि स्पष्टीकरण देण्याचे आदेश नेटफ्लिक्सला दिले आहेत.

नेटफ्लिक्सची ‘बॉम्बे बेगम’ ही वेब सीरिज 8 मार्चपासून भेटीला आली आहे. अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित या सीरिजमध्ये पूजा भट्ट, अमृता सुभाष, शहाना गोस्वामी, प्लाबिता बोर-ठाकूर यांची मध्यवर्ती भूमिका आहे.bombay-begums-netflix

या सीरिजमध्ये 13 वर्षांची मुलगी ड्रग्जचे सेवन करताना दाखवली आहे. तसेच शाळकरी मुलांचे चित्रीकरण वाईट पद्धतीने दाखवल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ही कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here