एमपीएससी परीक्षा ठरल्याप्रमाणेच 21 मार्चला या परीक्षा

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्वपरीक्षा आता 21 मार्चला होणार आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. 14 मार्चला होणाऱया परीक्षेसाठी दिलेल्या हॉल तिकिटांवरच उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने 14 मार्च रोजी होणारी राज्य सेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला होता. गेल्या वर्षभरापासून काही ना काही कारणाने ही परीक्षा वारंवार रद्द होत होती. अवघ्या दोन दिवसांवर आलेली परीक्षा अचानक पुढे ढकलल्याने संतप्त झालेल्या उमेदवारांनी राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शुक्रवारी नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार एमपीएससीने आता राज्य सेवा पूर्वपरीक्षेसाठी 21 मार्च ही तारीख जाहीर केली आहे.

27 मार्चला होणारी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा 2020 तसेच 11 एप्रिलला होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 या दोन परीक्षा नियोजित तारखांना घेतल्या जाणार आहेत. यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.






LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here