टीएमसीच्या नव्या बॅनरची पश्चिम बंगालमध्ये चर्चा

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये राजकीय रण तापले आहे. भाजपच्या सोशल मीडियावरील प्रचाराला तृणमूल काँग्रेसने ‘पोस्टर’द्वारे चोख उत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये प्रचारादरम्यान जखमी झाल्या. पायाला प्लॅस्टर घालावे लागले. हा हल्ला होता असा तृणमूल काँग्रेसचा आरोप आहे.

दुसरीकडे ममता यांनीही ‘मी व्हीलचेअरवरून प्रचार करेन’ असा भाजपला आवाज दिला आहे. या पार्श्वभूमीवर सोबतच्या छायाचित्रातील पोस्टर्स पश्चिम बंगालभर झळकली आहेत. खरे तर या पोस्टरमधील माहितीला भाषांतराची गरज नाही. पोस्टर म्हणतेय… ‘मित्रों, तुम्ही जेव्हा पुन्हा याल तेव्हा आम्ही तुमच्याशी जखमी पायाने नक्की लढू!’

ममता बॅनर्जी यांना शुक्रवारी सायंकाळी 6.50 च्या सुमारास एसएसकेएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या काही प्रमाणात पायाची हालचाल करू शकतील. मात्र त्यांना व्हीलचेअरचा आधार घ्यावाच लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here