पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंड संघाने दणदणीत विजय मिळवला असून ०-१ अशी आघाडी घेतली.इंग्लंड संघाने १२५ धावांच्या प्रत्युत्तरात १५.३ ओव्हरमध्ये ८ विकेट्स ने भारतीय संघाला पराभूत केले.


टॉस गमवून पहिले फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाजीक्रम गडगडल्यावर श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्याने अर्धशतकी भागीदारी करत संघाला शंभरी पार करून दिली, पण इंग्लिश खेळाडूंच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे यजमान संघ मोठी धावसंख्या गाठू शकली नाही परिणामी संघाला पहिल्या सामन्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

इंग्लंडने सामन्यात टॉस जिंकून यजमान भारतीय संघाला पहिले बॅटिंगला बोलावले, मात्र के एल राहुल १ वर बाद झाला तर कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला आणि शिखर धवन ४ रन्स करत माघारी परतला. दोन्ही संघातील पुढील सामना आता याच मैदानावर 14 मार्च रोजी खेळला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here