मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एका गाडीत स्फोटकं सापडली होती. या प्रकरणाचा तपास NIA द्वारे केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेवर उलट-सुलट चर्चा सुरु असतानाच अभिनेत्री कंगना रणौत हिनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. तिनं सचिन वाझे प्रकरणासाठी शिवसेनेला जबाबदार धरलं आहे. त्यांच्या विरोधात मोठं कारस्थान शिजत असल्याचा दावा तिनं आहे.
माझा अनुभव मला सांगतोय या प्रकरणात मोठं षडयंत्र रचलं जात आहे. शिवसेना सत्तेत आल्यानंतरच या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. जर या प्रकरणाचा योग्य तपास केला गेला तर आरोपी नक्कीच सापडतील अन् तसं झालं तर शिवसेनेचं सरकार देखील पडू शकतं. माझ्याविरोधात आणखी 200 गुन्हे लागू शकतात. याची मानसिक तयारी देखील मी केली आहे. जय हिंद. अशा आशयाचं ट्विट करुन कंगनानं सचिन वाझे प्रकरणी महाराष्ट्र सरकारला जबाबदार धरलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
My X-rays can detect huge conspiracy here,this cop was suspended after Shivsena came in power they got him back, if investigated properly not only hidden skeletons will roll out but even Maharashtra government will fall,I can also sense 200 more FIR’s on me, bring it on,Jai Hind https://t.co/Mt7KpKNghp
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 14, 2021
अंबानी यांच्या घराजवळ कार उभी करण्यात सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला आहे. या आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली आहे. वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयए न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. त्यांच्या कोठडीची मागणी देखील एनआयकडून केली जाणार आहे.






