मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत असलेले सचिन वाझे यांची पुन्हा एकदा प्रकृती बिघडली असून त्यांना मुंबईतील जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आता सलग दुसऱ्या दिवशी सचिन वाझे यांच्यावर डॉक्टर बोलावून उपचार करण्याची वेळ आली आहे. सचिन वाझे यांच्या चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून NIA कडून त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.
यापूर्वी शनिवारी रात्री सचिन वाझे यांची प्रकृती खालावली होती. एनआयएने त्यांची सलग 13 तास चौकशी केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांना थकवा जाणवायला लागला होता. त्यामुळे सचिन वाझे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात गेले होते. याठिकाणी त्यांना सलाईन लावण्यात आले होते, अशी माहितीही सूत्रांनी दिली होती.






