मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – महाराष्ट्रात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा थैमान घातला असून पुन्हा एकदा राज्यात कोरोना रुग्नांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारकडून एक महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे.
या निर्णयानुसार, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना दिवसाआड कामावर बोलवण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचं पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी एका शिफ्ट ऐवजी 2 शिफ्ट सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु, तरीदेखील मंत्रालयातील गर्दी कमी होत नव्हती.
परिणामी आता ठाकरे सरकारने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड कामावर बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.






