मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – ठाणे जिल्हा बँक निवडणूक मार्च महिन्याच्या अखेरीस पार पडणार असून ही निवडणूक महाविकास आघाडीकडून एकत्रित लढवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
ठाणे जिल्हा बँक निवडणूकीसाठी ६ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत, परंतु १५ जागांसाठी आता उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
ठाणे मध्यवर्ती बँकेचे निवडणूक येत्या 30 मार्चला होणार असून 31 मार्चला मतमोजणी केली जाणार आहे. तर ही निवडणूक महाविकास आघाडी संयुक्तपणे लढवणार असल्याचे एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले होते.






