महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांना मध्य प्रदेशमध्ये रहावे लागणार ७ दिवस क्वारंटाइन

मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – कोरोनाच्या वाढत्या संक्रमनामुळे मध्य प्रदेश सरकाराने एक महत्वपूर्ण निर्णय घेत नव्या गाईडलाइन्स जाहीर केल्या आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर नियंत्रण मिळावे यासाठी त्यांनी आता महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात येणाऱ्या नागरिकांना सात दिवस क्वारंटाइन रहावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या व्यतिरिक्त गाईडलाइन्समध्ये असे सुद्धा सांगण्यात आले आहे की, दुकानांच्या बाहेर सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन केले जावे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढत चालला आहे.

गेल्या २४ तासात १६,६२० नव्या रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. हे यंदाच्या वर्षातील एकाच दिवसातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. मध्य प्रदेशाची सीमा ही महाराष्ट्राला लागूनच आहे. त्यामुळेच राज्यातील शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here