मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – आज गोव्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह स्टार स्पोर्ट्स अँकर आणि मॉडेल संजना गणेशन लग्नबंधनात अडकले आहेत.
गोव्यातील एका गुरुद्वारामध्ये हा विवाहसोहळा पार पडला असून बुमराह आणि संजनाच्या विवाह सोहळ्यात कोरोना साथीची सर्व नियमांचे पालन केले गेले. बुमराह आणि संजना गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या वृत्ताबाबत सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.
आज जसप्रीत बुमराहने स्वतः लग्नाचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. या बातमीनंतर अनेकांनी बुमराहवर शुभेच्छांचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. बुलंद पोलीस टाइम्सतर्फे देखील जसप्रीत बुमराह आणि संजना गणेसन यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा!






