मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित नुकतीच द स्कॅम 1992 ही सीरीज प्रदर्शित झाली होती. आता हर्षद मेहताच्या आयुष्यावर चित्रपट येत आहे. अभिषेक बच्चन याची प्रमुख भुमिका असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हर्षद मेहताच्या जीवनावर आधारित द बिग बुल या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. अभिषेक बच्चनची या चित्रपटात प्रमुख भुमिका आहे. अभिषेक बच्चनला या व्यक्तिरेखेत पाहून प्रेक्षकांना गुरू चित्रपटाची भुमिका आठवली आहे. गुरू चित्रपटात अभिषेकने एका उद्योजकाची भुमिका वठवली होती. गुरू हा चित्रपट धीरुभाऊ अंबानी यांच्या जीवनावर आधारित होता असे म्हटले जात होते.
Introducing The Big Bull… The mother of all scams!!! Trailer out on 19th March. #TheBigBull releasing on 8th April, stay tuned!#DisneyPlusHostarMultiplex
@juniorbachchan @Ileana_Official @nikifyinglife @s0humshah @kookievgulati @ajaydevgn pic.twitter.com/BytYdEntfX— Disney+HotstarVIP (@DisneyplusHSVIP) March 16, 2021
मोठ्या कालावधीनंतर अभिषेक बच्चन एका मोठ्या भुमिकेत दिसणार आहे. यापूर्वी अभिषेक बच्चनने द ब्रेथ या वेबसीरीजमध्ये काम केले होते. तर हल्लीच ल्युडो हा नेटफ्लिकवरी सिनेमाही गाजला होता. द बिग बुल हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नसून डिस्ने हॉटस्टारवर 8 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.






