कोलंबो – श्रीलंकेत सुरक्षेच्या कारणास्तव बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे. श्रीलंकेतील पाकिस्तानी उच्चायुक्त साद खट्टाक यांनी एक बातमी ट्विट करून म्हटले आहे की, या निर्णयामुळे श्रीलंका आणि जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातील.
कोरोनामुळे आधीच श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा वेळी सुरक्षेच्या नावखाली द्वेष निर्माण करणारे निर्णय घेतल्याने अल्पसंख्यांकांच्या मानवाधिकारावर गदा येईल असे साद यांनी म्हटले आहे.
https://t.co/BjrnFSoesO
The likely ban on Niqab #SriLanka will only serve as injury to the feelings of ordinary Sri Lankan Muslims and Muslims across the globe. At today's economically difficult time due to Pandemic and other image related challenges faced by the country— Ambassador Saad Khattak (@SaadKhtk) March 15, 2021
यापूर्वी श्रीलंकेने कोरोना रुग्णांचा मृतदेहांवर अग्निसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हाही पाकिस्तानसह अनेक मुस्लिम संघटनांनी विरोध दर्शवला होता. मुस्लिम समाजात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला दफन करण्याची पद्धत आहे. नंतर श्रीलंकेने हा निर्णय मागे घेतला होता.
श्रीलंकेची एकूण लोकसंख्या 2 कोटी 20 लाख इतकी आहे, त्यात बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या 70 टक्के इतकी आहे. 12 टक्के हिंदू, 10 टक्के मुस्लिम तर 6 टक्के लोकसंख्या ख्रिश्चन समुदायाची आहे.






