गोरेगाव खडकपाडा येथील सामना परिवार गोडाऊनला भीषण आग

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – गोरेगाव खडकपाडा येथील सामना परिवार गोडाऊनला मंगळवार (आज) सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे ८ फायर इंजिन आणि ५ जंबो वॉटर टँकर दाखल झाले आहेत.

दरम्यान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. सुमारे १५ ते २० हजार चौरस फूट जागेवर आग पसरल्याची माहिती आहे. मात्र या आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here