आ. गिरीश महाजन यांना कोरोनाची बाधा

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

आमदार गिरीश महाजन यांना काही दिवसांपासून कोरोनासारखी लक्षणे जाणवत होती. या अनुषंगाने चाचणी करून घेतली असता त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जामनेरमध्ये क्वॉरंटाईन होऊन त्यांनी उपचार सुरू केले आहेत.

जळगाव महापालिकेत भाजपमध्ये उभी फूट पडली असून राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमिवर आ. गिरीश महाजन यांना कोरोनाची बाधा झाल्याने भाजपला धक्का बसला आहे.काही दिवसांपूर्वीच आमदार महाजन यांच्या पत्नी तथा जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांना आणि त्यांच्या कन्येलाही कोरोना झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here