माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे बुधवारी निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृती बिघडलेली होती.

दिल्लीतील खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. 17 मार्च 2021 रोजी त्यांनी पहाटे जगाचा निरोप घेतला. दिलीप गांधी हे गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील गांधी रुग्णालयातच होते.

दरम्यान त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. मंगळवारीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यांना मंगळवारी दुपारपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here