मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजेच आपली आर्ची पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरू आता प्रेक्षकांना ‘आठवा रंग प्रेमाचा’ दाखवणार आहे.
चित्रपटाचे टायटल सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत आहे.
समीर कर्णिक, राकेश राऊत आणि आशिष भालेराव या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.






