मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – इयत्ता १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने प्रश्नसंच उपलब्ध करून दिले आहे. मात्र यामध्ये भरपूर चुका आहेत. काही प्रश्न एकापेक्षा अनेक वेळा विचारले गेले आहेत. तर वगळलेल्या अभ्यासक्रमाबाबतही प्रश्न देण्यात आले आहेत. यावरून विद्यार्थी आणि पालक नाराज असून सोसिअल मेड़ीवरून नाराजी व्यक्त होत आहे.
राज्य शैक्षणिक आणि संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पहिल्या टप्प्यात बारावीच्या ७ आणि दहावीच्या ६ विषयांचे प्रश्नसंच उपलब्ध केलेलं आहेत. पुढील काही दिवसात सर्वच विषयांचे प्रश्नसंच मिळणार आहेत.






