निवडणुकीत कोसळतोय पैशांचा धो धो पाऊस; आत्तापर्यंत 331 कोटी जप्त

नवी दिल्ली – पश्चिम बंगालसह चार राज्ये आणि पुद्दुचेरीत विधानसभा निवडणुकांचा प्रचार रंगतो आहे. मात्र याचवेळी येथे पैशांचा पाऊसही पडल्याचे उघड झाले आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी येथून थोडेथोडके नव्हे तर तब्बल 331 कोटी रुपये जप्त केले आहेत.

निवडणूक आयोगाने आज याची माहिती देताना 2016 च्या निवडणुकांमध्ये जप्त केलेल्या नोटांपेक्षा ही आकडेवारी कितीतरी अधिक असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाचे 295 अधिकारी या राज्यांमध्ये निवडणूक खर्चावर लक्ष ठेवून असून तामीळनाडूत सर्वात जास्त 127.64 कोटी, तर पश्चिम बंगालमध्ये 112.59 कोटी रुपये सापडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here