महिलेने विमान प्रवासात दिला मुलीला जन्म

नवी दिल्ली – बेंगळूरुहून जयपूरला निघालेल्या विमानात एका महिलेने मुलीला जन्म दिला. कॅबिन क्रू आणि डॉक्टरांनी मदत केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विमान प्रवासादरम्यान महिलेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या. इंडिगोच्या 6E-469 ही घटना घडली.

महिलेला प्रसूतीकाळा सुरू झाल्याचं कळताच विमानातील कर्मचाऱ्यांनी विमानात कुणी डॉक्टर आहे का? अशी माइकवरून विचारणा केली. रेल्वेतील कर्मचारी सुभाना नाझीर या ही उद्घोषणा ऐकून पुढे सरसावल्या. विमानातील कर्मचाऱ्यांच्या सहायाने त्यांनी महिलेच्या प्रसूतीसाठी मदत केली. तसंच नवजात बाळाची डॉक्टरांनी पूर्ण काळजी घेतली. जयपूर विमानातळाला यासंदर्भात माहिती दिली गेली. तसंच डॉक्टर आणि अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याची सूचना दिली गेली. विमानतळावर उतरताच त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. आई आणि बाळ या दोघांची प्रकृती उत्तम आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

इंडिगोची हे विमान बेंगळुरूहून पहाटे ५.४५ वाजता निघाले होते. हे विमान जयपूरमध्ये ८ वाजता उतरले, अशी माहिती इंडिगोकडून देण्यात आली. दरम्यान, इंडिगोकडून नाझीर यांचा ऑरेंज कार्ड देऊन सन्मान केला गेला. त्या २०१९ पासून रेल्वेच्या वैद्यकीय सेवेत आहेत, अशी माहिती रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here