लग्नाचे आमिष दाखवत जवानाने केला तरूणीवर बलात्कार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – लग्नाचे आमिष दाखवून सैन्यदलातील जवानाने एका तरूणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. एप्रिल 2020 पासून अनेक वेळा त्याने तिच्यावर अत्याचार केला.

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार जवानावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रसाद अनिल ननावर (वय 26) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. सध्या ते राजस्थानमध्ये पोस्टिंगवर आहे. हा प्रकार घडला तेव्हा तो पुण्यातील सदर्न कमांडमध्ये पोस्टिंगला होता.

प्रसादची संबंधित तरुणीशी ओळख झाली होती. त्याने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादीच्या आई-वडिलांना वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. पैसे मिळाल्यानंतर प्रसादने पीडित तरुणीसोबत लग्न करण्यासाठी नकार दिला आहे. संबंधित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here