कोणत्याही खेळाडूने असे पाऊल उचलू नये – गीता फोगाट

नवी दिल्ली – भारताच्या स्टार महिला कुस्तीपटू बबीता फोगाट आणि गीता फोगाट यांची मामेबहिण रितिका फोगाटने एका कुस्ती स्पर्धेतील पराभवानंतर आत्महत्या केली. रितिकाच्या आत्महत्येमुळे फक्त फोगाटच नाही तर संपूर्ण क्रीडा विश्वाला धक्का बसला.

भारताकडून २०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकणारी गीता फोगाट आणि कुटुंबीयांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे. रितिकाने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे गीता निराश झाली. जय-पराजय हा खेळाडूच्या आयुष्याचा भाग असतो. कोणत्याही खेळाडूने असे पाऊल उचलू नये.

रितिकाच्या आत्महत्येनंतर गीता फोगाटने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे. परमेश्वर माझी बहिण रितिकाच्या आत्म्याला शांती देवो. माझ्या कुटुंबासाठी ही अत्यंत दुख:द वेळ आहे. रितिका खुप चांगली कुस्तीपटू होती. पण तिने असे पाऊल का उचलले हे मात्र कळू शकले नाही. जय-पराजय हा प्रत्येक खेळाडूच्या आयुष्याचा भाग असतो. म्हणून कोणत्याही खेळाडूने असे पाऊल उचलू नये.

१७ वर्षीय रितिकाने राजस्थानमधील भरतपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर स्पर्धेत भाग घेतला होता. ५३ किलो वजनी गटात रितिका अंतिम फेरीत पोहोचली होती. पण फायनलमध्ये तिचा एका गुणाने पराभव झाला. या पराभवानंतर रितिका निराश झाली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here