ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – चित्रपट आणि नाटक विषयांवरील ज्येष्ठ पत्रकार अशोक शेवडे (77) यांचे गुरुवारी सकाळी कोरोनामुळे डोंबिवलीत निधन झाले. पाच हजार मुलाखतींचा बादशहा अशी त्यांची ख्याती होती.
समाजातील विविध क्षेत्रातील संस्थांना त्यांनी प्रकाशझोतात आणले होते. कोरोनानंतर त्यांच्या ‘चंदेरी सोनेरी’ या कार्यक्रमाचा 400वा कार्यक्रम सादर होणार होता, पण त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना आर. आर. रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.






